पंतप्रधान मोदी आज अविश्वास प्रस्तावावर देणार उत्तर

मुंबई १० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरत आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपला धारेवर धरलं आहे. काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांनीही आपल्या भाषणात मोदी सरकारवर हल्लाबोल केला. अविश्वास ठरावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत ८ ऑगस्टपासून […]

पंतप्रधान मोदी आज अविश्वास प्रस्तावावर देणार उत्तर

मुंबई १० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरत आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपला धारेवर धरलं आहे. काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांनीही आपल्या भाषणात मोदी सरकारवर हल्लाबोल केला. अविश्वास ठरावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत ८ ऑगस्टपासून चर्चा सुरु झाली. राहुल गांधी म्हणाले की, मणिपूरमध्ये भारताची हत्या झाली. मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या झाली आहे. तुम्ही मणिपूरचे दोन भाग केलंय, तोडलंय.

मणिपूर हे भारताचा भाग असल्याचे मोदी मानत नाहीत, असा आरोप केला. सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चेला उत्तर दिले. ते म्हणाले, केवळ भ्रम निर्माण करण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणला गेला आहे. तुमचा भलेही अविश्वास असेल, परंतु जनतेचा मोदींवर विश्वास आहे. मणिपुरात तात्कालिक कारणांमुळे हिंसाचाराचा भडका उडाला. जे झाले ते लाजिरवाणे आहे. त्याचे राजकारण करणेही लज्जास्पद आहे, अशी टीका शाह यांनी केली.

अविश्वास ठरावावर आज मतदान पार पडणार आहे. त्यामुळे केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची आज संसदेत परीक्षा पार पडणार आहे. विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर आज मतदान होणार आहे. यामुळे आजच्या या ठरावावरून कुणाकडे संख्याबळ हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मोदी सरकार राहणार की जाणार? याकडे देशाचे लक्ष लागले आहे. मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन भाजपा आणि पंतप्रधानांवर हल्लाबोल केला. त्याला उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार युक्तिवाद केला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावाला उत्तर देणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number