आमिरची लेक अडकणार लग्न अबंधनात

मुंबई, ०८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा नेहमीच चर्चेत असतो. आमिरसह त्याची मुलगी इरा खानदेखील बऱ्याचदा चर्चेत असते. अशातच आता इरा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. याबाबतीत तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर खास पोस्ट करत माहिती दिली. अभिनेता आमिरची लेक इरा खान हिने 18 नोव्हेंबर रोजी तिचा प्रियकर नुपूर शिखरेसोबत साखरपुडा […]

आमिरची लेक अडकणार लग्न अबंधनात

मुंबई, ०८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा नेहमीच चर्चेत असतो. आमिरसह त्याची मुलगी इरा खानदेखील बऱ्याचदा चर्चेत असते. अशातच आता इरा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. याबाबतीत तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर खास पोस्ट करत माहिती दिली.

अभिनेता आमिरची लेक इरा खान हिने 18 नोव्हेंबर रोजी तिचा प्रियकर नुपूर शिखरेसोबत साखरपुडा केला. यावेळचे त्यांचे काही खास फोटो समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाले. त्यानंतर तिचे चाहते या दोघांच्या लग्नाची वाट बघत आहेत. दरम्यान अलीकडेच एका मुलाखतीत तिने आपल्या लग्नाबाबतीत खास माहिती दिली आहे.

इराने एका मुलाखतीत ती 3 जानेवारीला लग्न करणार असल्याचे सांगितले. परंतू अद्याप कोणत्या वर्षी लग्न करणार हे ठरवलेले नाही.याबाबतीत बोलताना तिने या तारखेचे खास कारण देखील सांगितले. इराचा प्रियकर नुपूर हा एक फिटनेस ट्रेनर आहे. फिटनेस एक्स्पर्ट आणि कंन्सलटंट म्हणुन तो काम करतो. बऱ्याच वर्षांपासून तो इराचा फिटनेस ट्रेनर म्हणून काम पाहत होता. त्याने केवळ इराच नव्हे तर सुष्मिता सेन आणि आमिर खानला देखील फिटनेसचे धडे दिले आहेत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number