इरशाल वाडी दरडग्रस्त ग्रामस्थांच्या कायमस्वरूपी पुर्नवसनाच्या कामाला वेग. सुमारे साडे ६ एक्कर जागेत इरसाळवाडी दरडग्रस्तांचे पुर्नवस होणार.जागेची मापणी करुन शासन दरबारी प्रस्ताव देखील सादर झाला आहे.
मानिवली गावतील शासनाच्या मालकीची जमीन इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांचे पुर्नवसन करण्यासाठी निश्चित करण्यात आली आहे. मानिवली गाव हद्दीतील सर्वे क्रमांक २७/१ ब या गुरचरण जागेपैकी सुमारे ६ एकर जागेत इर्शाळवाडी दरडग्रस्तांचे पुर्नवस होणार आहे. या जागेचे मोजमाप करुन शासन दरबारी प्रस्ताव देखील सादर झाला आहे.
त्यामुळे इरशाळवाडी दरडग्रस्तांना निवासाची सोया लवकरच उपलबद्ध होणार असल्याचे चित्र दिसत आहे. ५७ ग्रामस्थांना बेपत्ता जाहीर करून मृत घोषित करण्याची प्रक्रिया देखील सध्या सुरू आहे