‘एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार’

मुंबई, २४ जुलै २०२३, प्रतिनिधी: राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाची भाकरी फिरवली जाणार असल्याच्या चर्चा सुरु झालेल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या सगळ्या वावड्या असल्याचं म्हटलं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करुन भाजपसोबत सत्तेत जाणं पसंत केलं. २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी अचानक शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप […]

‘एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार’

मुंबई, २४ जुलै २०२३, प्रतिनिधी: राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाची भाकरी फिरवली जाणार असल्याच्या चर्चा सुरु झालेल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या सगळ्या वावड्या असल्याचं म्हटलं आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करुन भाजपसोबत सत्तेत जाणं पसंत केलं. २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी अचानक शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला. अजित पवार यांच्यासोबत ३५च्या पुढे आमदार असल्याचं सांगितलं जात आहे.
अजित पवारांच्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडनंतर बंडानंतर राज्यामध्ये मुख्यमंत्री बदलला जाईल अशा अनेक अफवा पसरवल्या जात होत्या. परंतु सोमवारी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचा अफवांना स्पष्टकोटी दिलेली आहे.

त्यातच परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीवारी केली. त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांनी ही भेट सहकुटुंब घेतली. त्यामुळे पुन्हा त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल चर्चा सुरु झालेल्या होत्या.

या सगळ्या चर्चा म्हणजे वावड्या आहेत, असं आता देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. काही वेळापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी १० तारखेनंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील, असं विधान केलं होतं. ‘अफवा पसरवणाऱ्यांनी गप्प राहावे’ असं देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सज्जड दम दिला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

काही लोक महायुतीतील नेत्यांच्या मनात संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आमच्या मनामध्ये कसलाही संभ्रम नाही. अनेक नेते राजकीय भविष्य सांगत आहेत. परंतु त्यांचं काहीही खरं नाही. मी अधिकृतपणे सांगतो की, ९, १०, ११ तारखेला काहीही होणार नाही. झालंच काही तर आमचा विस्तार होईल. परंतु त्याची तारीख ठरली नाही. त्यामुळे आता समझदार को इशारा काफी हैं..

फडणवीस पुढे म्हणाले, प्रत्येकाने बोलतांना वास्तवाचं भान ठेवलं पाहिजे. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. तेच राहणार आहे, हे तिन्ही नेत्यांना पक्कं माहिती आहे. त्यामुळे वावड्या उठवणं बंद करा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number