‘चांद्रयान – ३’ चा प्रवास चंद्राकडे

चांद्रयान-३ मोहिमेच्या प्रक्षेपणाचा दिवस आहे. शुक्रवारी, १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता, आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान-३ प्रक्षेपित झाले संपूर्ण देशाच्या नजरा या प्रक्षेपणाकडे लागल्या होत्या. केवळ इस्रोचे शास्त्रज्ञच नाही तर देश आणि जग या मोहिमेवर लक्ष ठेवून होते. प्रक्षेपित होण्याआधी गोष्टी चेक केल्या गेल्या. ही मोहीम यशस्वी झाल्याने भारत अवकाशातील […]

‘चांद्रयान – ३’ चा प्रवास चंद्राकडे

चांद्रयान-३ मोहिमेच्या प्रक्षेपणाचा दिवस आहे. शुक्रवारी, १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता, आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान-३ प्रक्षेपित झाले संपूर्ण देशाच्या नजरा या प्रक्षेपणाकडे लागल्या होत्या. केवळ इस्रोचे शास्त्रज्ञच नाही तर देश आणि जग या मोहिमेवर लक्ष ठेवून होते. प्रक्षेपित होण्याआधी गोष्टी चेक केल्या गेल्या. ही मोहीम यशस्वी झाल्याने भारत अवकाशातील चौथी महासत्ता बनणार आहे.

चांद्रयान ३ श्रीहरिकोटा येथून निघाले
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने शुक्रवारी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हेवीलिफ्ट LVM3-M4 रॉकेटवर तिसरी चंद्र मोहीम – चांद्रयान ३ लाँच केली. डॉ जितेंद्र सिंग, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथे चांद्रयान ३, मोहिमे वेळी उपस्थित होते.

चांद्रयान-३ चे बजेट किती आहे?
चांद्रयान-३ चा एकूण खर्च ६०० कोटी रुपयांनी वाढला आहे. यापूर्वी चांद्रयान-२ साठी ९०० कोटींहून अधिक बजेटची तरतूद करण्यात आली होती. मात्र, त्याची चीन आणि अमेरिकेच्या चंद्र मोहिमेशी तुलना केली तर ती खूपच कमी आहे.

‘१४ जुलै सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून चांद्रयान-३ मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या आणि असेही म्हटले- ‘१४ जुलै २०२३ हा दिवस नेहमी सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. चांद्रयान-३ ही आपली तिसरी चंद्र मोहीम आज आपल्या प्रवासाला निघणार आहे. हे उल्लेखनीय मिशन आपल्या देशाच्या आशा आणि स्वप्नांना पुढे नेईल.’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number