मुंबई, ११ जुलै २०२३, प्रतिनिधी: डीआरडीओ संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता यांच्याशी सोशल मीडियावर क्षेपणास्त्रांविषयी चर्चा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.
एटीएसच्या दोषारोपपत्रात याबाबत धक्कादायक उल्लेख करण्यात आला होता. आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रदीप कुरुलकर यांनी दोन महिलांवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने दाखल केलेल्या आरोपपत्रात ही माहिती देण्यात आली आहे. सूत्रांचा माहितीनुसार, एटीएसने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात कुरुलकर यांनी दोन महिलांचे शोषण केल्याचा आरोप ठेवला आहे. महिलांचे जबाब एटीएसच्या पथकाने नोंदवून घेतले होते. कुरुलकरांनी डीआरडीओतील कामे मिळवून देण्याच्या आमिषाने दाेन महिलांवर अत्याचार केल्याचे दोषारोपपत्रात नमूद केले आहे.