‘भाजपाला सत्तेची मस्ती, आत्मविश्वास नाही’

अमरावती, १० जुलै २०२३, प्रतिनिधी: शिवसेनेतील फुटीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहेत. उद्धव ठाकरे दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यवतमाळमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरे सोमवारी अमरावती दौऱ्यावर आले होते. अमरावतीत त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी भाजपचा उल्लेख नामर्द, घरफोडे आणि घरचेभेदी […]

‘भाजपाला सत्तेची मस्ती, आत्मविश्वास नाही’

अमरावती, १० जुलै २०२३, प्रतिनिधी: शिवसेनेतील फुटीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहेत. उद्धव ठाकरे दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यवतमाळमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरे सोमवारी अमरावती दौऱ्यावर आले होते. अमरावतीत त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी भाजपचा उल्लेख नामर्द, घरफोडे आणि घरचेभेदी अशी खोचक टीका करत भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. भाजपला सत्तेची मस्ती आल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली.

अमरावती दौऱ्यादरम्यान उद्धव काय म्हणाले?
मी घरी बसून होतो. मान्य आहे. पण मी कुणाची घरं फोडली नाही. घर फोडे तुम्ही आहात. मी घरी बसून जी कामं केली, ती तुम्हाला घरं फोडून करता आली नाही. तुम्हाला दारं उरली नाही. तुम्हाला कोणी विचारत नाही. त्यामुळेच शासन आपल्या दारी सुरू आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यक्रमात गर्दीसाठी बसवलं जात आहे. ही वेळ का आली तुमच्यावर? काम केली असती तर असे कार्यक्रम घेण्याची वेळ तुम्हाला वेळ आली नसती.

भाजपला सत्तेची मस्ती

तुमच्यावर ही वेळ का आली? मस्ती आणि आत्मविश्वास हे दोन शब्द आहेत. यातील भाजपला सत्तेची मस्ती आली आहे. पण त्यांना त्यांच्या ताकदीचा आत्मविश्वास नाही. निवडून येऊच शकत नाही ही धाकधूक आहे. त्यामुळेच समोर कुणालाच ठेवत नाही. मर्दाची अवलाद असाल तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा आणि मैदानात या, असं आव्हानच त्यांनी दिलं. राजकारणातील नामर्द तुम्ही. तुमची ताकद कधी होती?, असा सवाल देखील ठाकरेंनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number