शरद पवारांनी भाकरी फिरवली

दिल्ली , १० जून २०२३, प्रतिनिधी : शरद पवार यांनी दिल्लीतून भाकरी फिरवली आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापण दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी मोठी घोषणा केली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या आधी राष्ट्रवादीमध्ये कार्यकारी अध्यक्ष हे पद नव्हते. या आधी शरद पवार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला तेव्हा […]

शरद पवारांनी भाकरी फिरवली

दिल्ली , १० जून २०२३, प्रतिनिधी : शरद पवार यांनी दिल्लीतून भाकरी फिरवली आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापण दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी मोठी घोषणा केली आहे.

प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या आधी राष्ट्रवादीमध्ये कार्यकारी अध्यक्ष हे पद नव्हते. या आधी शरद पवार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला तेव्हा देखील कार्यकारी अध्यक्षाच्या चर्चा दबक्या आवाजात होत होती, मात्र शरद पवार यांनी मोठा निर्णय घेत प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रफुल पटेल यांच्याकडे गुजरात, राजस्थान, झारखंड या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, सध्या तरी अजित पवार यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही.

शरद पवारांचा राजीनामा
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. या राजीनाम्यावर निर्णय घेण्यासाठी पक्षाने एका समितीची स्थापना केली होती. या समितीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळला आणि कार्यकारी अध्यक्ष नियुक्त करण्याची शिफारस केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number