अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन, फडणवीसांकडून उदघाटन

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शहरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. यावेळी सोमवारी पिंपरी चिंचवड येथील ग. दि. नाट्यगृहाचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटन जरी फडणवीसांच्या हस्ते झाले असले तरी हे नाट्यगृह एका वेगळ्या बॅनरमुळे चर्चेत आले आहे. या बॅनरवर अजित दादांच्या हस्ते भूमिपूजन आणि […]

अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन, फडणवीसांकडून उदघाटन

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शहरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत.

यावेळी सोमवारी पिंपरी चिंचवड येथील ग. दि. नाट्यगृहाचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटन जरी फडणवीसांच्या हस्ते झाले असले तरी हे नाट्यगृह एका वेगळ्या बॅनरमुळे चर्चेत आले आहे. या बॅनरवर अजित दादांच्या हस्ते भूमिपूजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण असा मजकूर आहे. त्यामुळे या बॅनरची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

११ जुलै २०१४ साली अजित पवार यांनी या नाट्यगृहाचे भूमिपूजन केले होते. तेव्हापासून नाट्यगृहाचे काम सुरू होते. मात्र, आता तब्बल १० वर्षनंतर या नाट्यगृहाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे अजित दादांनी केलेला वादा फडणवीसांनी पूर्ण केला अशा आशयाचे बॅनर या परिसरात झळकले आहेत.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे जरी राजकीय विरोधक असले तरी त्यांची मैत्री राजकारणात पलीकडची असल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. या बॅनरमधून पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांती जवळीकीची चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number