गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी तालुक्यापासून पाच किमी अंतरावर असलेल्या चीचडोह प्रकल्पात पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांचा खोलगट पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातल्या चीचडोह बॅरेजच्या दरवाज्याखालील खोलगट भागात पोहण्यासाठी चार युवक गेले होते. या चार युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मोनु त्रिलोक शर्मा (२६) रा.गडचिरोली, प्रफुल विठ्ठल येलुरे (२०), शुभम रुपचंद लांजेवार (२४), महेश मधुकर घोंगडे (२०) चामोर्शी येथील मृतकांची नावे आहेत.