‘डॉन ३’ ची आतुरता वाढली

मुंबई, १४ मे २०२३, प्रतीनिधी : बॉलीवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान याची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. शाहरुखचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमी आतुर असतात. अलीकडेच त्याच्या पठाण या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कामे केली. दरम्यान जवान आणि टायगर ३ साठी शाहरुख सज्ज झालाय. अशातच आता त्याचा गाजलेला चित्रपट डॉन बद्दल मोठी […]

‘डॉन ३’ ची आतुरता वाढली

मुंबई, १४ मे २०२३, प्रतीनिधी : बॉलीवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान याची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. शाहरुखचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमी आतुर असतात.
अलीकडेच त्याच्या पठाण या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कामे केली. दरम्यान जवान आणि टायगर ३ साठी शाहरुख सज्ज झालाय. अशातच आता त्याचा गाजलेला चित्रपट डॉन बद्दल मोठी बातमी समोर आली आहे.

एका मुलाखतीत डॉनचे निर्माते रितेश सिधवानी यांनी डॉन या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल खुलासा केला आहे. या वेळी ते म्हणाले,”सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. पण जोपर्यंत फरहान अख्तर सिनेमाची स्क्रीप्ट लिहित नाही तोपर्यंत काहीच होणं शक्य नाही. सध्या फरहान सिनेमाच्या स्क्रीप्टवर काम करत आहे. आम्ही सगळेच ‘डॉन ३’ ला रिलीज करण्यासाठी उत्सुक आहोत”. यामुळे आता त्याचे चाहते आतुर झालेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number