‘मोफत पास न दिल्यास नाटक बंद’

पिंपरी – चिंचवड शहरातील एच.ए. मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे मोफत पासेस मिळावे, यासाठी पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीसाने चक्क धमकी दिल्याचा आरोप अभिनेता तसेच शिरूर लोकसभा क्षेत्राचे खासदार आणि संभाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारणारे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. या महानाट्याला पिंपरी चिंचवडकरांचा भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. मात्र, या […]

‘मोफत पास न दिल्यास नाटक बंद’

पिंपरी – चिंचवड शहरातील एच.ए. मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे मोफत पासेस मिळावे, यासाठी पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीसाने चक्क धमकी दिल्याचा आरोप अभिनेता तसेच शिरूर लोकसभा क्षेत्राचे खासदार आणि संभाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारणारे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. या महानाट्याला पिंपरी चिंचवडकरांचा भरघोस प्रतिसाद मिळतो आहे.

मात्र, या नाटकाचे फ्री पास मिळावे म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस दलातील पोलिसाने चक्क नाटकाच्या आयोजकाला दम दिल्याचा आरोप अमोल कोल्हे यांनी केला आहे. “फ्री पास दिला नाही, तर नाटक कसं होते ते मी पाहतो” असं म्हणत पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने नाटकाच्या आयोजकाला दम दिल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. त्यासोबतच त्यांनी गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी करावी अशी मागणी देखील केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number