साईंच्या नगरीमध्ये दररोज देश विदेशातील हजारो साई भक्त साईंच्या चरणी दर्शनासाठी येत असतात. यातील बहुतांशी भक्त दर्शन रांगेतुन जावुन दर्शन घेतात. त्यानंतर ते मंदिर प़रीसरात फिरतात त्यावेळी ते अनवानी असतात. मात्र त्याच वेळी मंदीर परीसरातील सुरक्षारक्षक ,अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चप्पल बूट घालून फिरत असतात.
त्यामुळे आता नव्याने आलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांनी साईबाबा मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी साई मंदिर परिसरामध्ये सुरक्षारक्षक ,अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चप्पल बूट घालून प्रवेशावर बंदी केली.
शनिवार पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.