दरड कोसळल्यानं परशुराम घाट होता बंद

मुंबई – गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. परशुराम घाटाला पर्यायी मार्ग असणाऱ्या चिरणी आंबडस मार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. मात्र पोलिसांनी आता वाहतूक सुरळीत केली आहे. तर परशुराम घाटातील रस्त्यावर आलेल चिखल मिश्रित माती काढण्याच काम युद्धपातळीवर सुरु आहे. सध्या या ठिकाणाहून एकेरी वाहतूक सुरु करण्यात यश आले आहे. मात्र, […]

दरड कोसळल्यानं परशुराम घाट होता बंद

मुंबई – गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. परशुराम घाटाला पर्यायी मार्ग असणाऱ्या चिरणी आंबडस मार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. मात्र पोलिसांनी आता वाहतूक सुरळीत केली आहे. तर परशुराम घाटातील रस्त्यावर आलेल चिखल मिश्रित माती काढण्याच काम युद्धपातळीवर सुरु आहे. सध्या या ठिकाणाहून एकेरी वाहतूक सुरु करण्यात यश आले आहे. मात्र, दरड खाली येण्याचा धोका आहे. त्यामुळे परशुराम घाटातून प्रवास करताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

परशुराम घाटाचे गेल्या काही दिवसांपासून रुंदीकरण सुरू आहे. यासाठी ठराविक दिवशी हा बंद ठेवला जातो. मात्र, काल रात्री या ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व माती रस्त्यावर आली. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जेसीबीच्या साहय्याने युद्धपातळीवर माती हटवण्याचे काम सुरु असून लोटे-चिरणी-कळंबेस्ते-चिपळूण मार्गाने वाहतुक वळवण्यात आली.

डोंगरची माती रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या चार तासाच्या प्रयत्नानंतर परशुराम घाटातील वाहतूक सुरळीत करण्यात यश आले आहे. मात्र, रस्त्यावर आलेली माती बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले तरी अवकाळी पाऊस झाला तर पुन्हा माती खाली येण्याची शक्यता आहे. पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे भरावातील मातीचा चिखल परशुराम घाटातील रस्त्यावर आल्याने चिपळूणकडे जाणारी वाहतूक बंद पडली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number