द केरला स्टोरी या चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. या चित्रपटावर सतत बंदी घालण्याची मागणी केली जात असून, या चित्रपटाचे टिझर रिलीज झाल्यापासूनच चित्रपटाच्या विरोधात वातावरण दिसून येतंय. मात्र, या सर्व वादानंतर द केरला स्टोरी हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय.
पश्चिम बंगाल सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेत द केरळ स्टोरी चित्रपटावर बंदी घातलीये. एकीकडे प्रेक्षक या चित्रपटाला उदंड असा प्रतिसाद देताना दिसत आहेत. तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये चित्रपटावर थेट बंदी घातली जात आहे.
विशेष म्हणजे विरोध होत असताना देखील द केरला स्टोरी हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहेत. ओपनिंग डे चित्रपटाने तूफान अशी कामगिरी केलीये. तीन दिवसांमध्ये चित्रपटाने जवळपास ३५.८० कोटींचे कलेक्शन हे बाॅक्स आॅफिसवर केले आहे.
मुळात म्हणजे मी या विषयावर अभ्यास करण्यास द कश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या अगोदर सुरूवात केली होती. मला एक गोष्ट समजत नाहीये की, लोक द कश्मीर फाईल्स आणि द केरळ स्टोरी या चित्रपटांची तुलना का करत आहेत. हे दोन्ही चित्रपट खूप वेगळे आहेत आणि त्यांच्या स्टोरी देखील.