सत्तासंघर्षाच्या निकालाची प्रतीक्षा वाढली

गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रात सत्ताबदलाची चर्चा जोरदार सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार, शिंदे-फडणवीस सरकार जाणार, असे तर्क लावले जात आहेत. तर अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही आमदार घेऊन भाजपसोबत जाणार, असेही बोलले जात आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाची […]

सत्तासंघर्षाच्या निकालाची प्रतीक्षा वाढली

गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रात सत्ताबदलाची चर्चा जोरदार सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार, शिंदे-फडणवीस सरकार जाणार, असे तर्क लावले जात आहेत. तर अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही आमदार घेऊन भाजपसोबत जाणार, असेही बोलले जात आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाची वेळ आता जवळ येत चालली आहे. पुढचे तीन चार दिवस त्यादृष्टीनं निर्णायक असणार आहेत. त्यात राजकीय वक्तव्यांनी या सर्वोच्च न्यायालय देणार असलेल्या निकालाची प्रतिक्षा वाढली आहे. घटनापीठातले एक न्यायमूर्ती एम आर शाह हे १५ मे रोजी निवृत्त होतायत. १५ मे रोजी सोमवार आहे. १३ मे, १४ मे रोजी शनिवार, रविवार आहे. त्यामुळे निकाल ११ किंवा १२ मे रोजी येण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number