रत्नागिरीत राज ठाकरे यांची जाहीर सभा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी कोकण दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे एकाच वेळी राज, उद्धव दोन्ही ठाकरे बंधू कोकण दौऱ्यावरतोफा धडाडतांना दिसणार आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी उध्दव ठाकरे बारसू दौऱ्यावर आहेत तर उद्धव ठाकरे यांनी कोकणात येऊन दाखवावं असं आव्हान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं […]

रत्नागिरीत राज ठाकरे यांची जाहीर सभा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी कोकण दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे एकाच वेळी राज, उद्धव दोन्ही ठाकरे बंधू कोकण दौऱ्यावरतोफा धडाडतांना दिसणार आहे.

बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी उध्दव ठाकरे बारसू दौऱ्यावर आहेत तर उद्धव ठाकरे यांनी कोकणात येऊन दाखवावं असं आव्हान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. रत्नागिरीमध्ये या सभेच्या पूर्वीची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांची जाहीर सभा ही रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे होणार आहे. राज ठाकरे हे रत्नागिरीमध्ये दाखल झाले आहेत. राज ठाकरे सध्या रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात थाबंले आहे. या सभेची वातावरण निर्मिती मनसेकडून जोरदार करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांच्या सभास्थळावरून थेट बघा तयारीचा आढावा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number