पवारांच्या घोषणेनंतर राजीनामा सत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा २ मे रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर इथे पार पडला. या पुस्तक प्रकाशनावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची मोठी घोषणा केली. या घोषणेनंतर सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. पवारांच्या निवृत्ती निर्णयानंतर सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजीनामा देणार असल्याची माहिती येत आहेत. शरद पवारांच्या […]

पवारांच्या घोषणेनंतर राजीनामा सत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा २ मे रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर इथे पार पडला. या पुस्तक प्रकाशनावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची मोठी घोषणा केली. या घोषणेनंतर सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. पवारांच्या निवृत्ती निर्णयानंतर सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजीनामा देणार असल्याची माहिती येत आहेत.

शरद पवारांच्या या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी टाहो फोडला आहे. निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती कार्यकर्ते करीत आहेत. दरम्यान पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कार्यकारणी पदाधिकारी राजीनामा देणार आहेत. ‘शरद पवारांनी निर्णय मागे घेतल्यास राजीनामा देणार नाही’ अशी भूमिका राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घेतली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व कार्यकारणी सदस्य आणि पदाधिकारी राजीनामा देऊन शरद पवार यांच्यासोबत असल्याची भुमिका जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी जाहीर केली आहे.

बुलडाणा जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच धाराशिवचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनीही आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह कोकणातही अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामा मोहीम सुरु होण्याची शक्यता आहे. यानंतर राज्यभर शरद पवारांच्या निवृत्ती घोषणेनंतर राजीनामा सत्र सुरुच आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number