‘बारसू रिफायनरीबाबत फडणवीसांचे डोळे बंद का ?’

बारसू रिफायनरीला बहुतांश स्थानिकांचे समर्थन असून विरोधकांचा बारसु रिफायनरी परिसरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तसेच आमच्याकडे विशिष्ट माहिती आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं यावर खासदार विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. विनायक राऊत म्हणाले, महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, एवढा अज्ञानी गुहमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याला मिळाला. देवेंद्र […]

‘बारसू रिफायनरीबाबत फडणवीसांचे डोळे बंद का ?’

बारसू रिफायनरीला बहुतांश स्थानिकांचे समर्थन असून विरोधकांचा बारसु रिफायनरी परिसरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तसेच आमच्याकडे विशिष्ट माहिती आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं यावर खासदार विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.

विनायक राऊत म्हणाले,
महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, एवढा अज्ञानी गुहमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याला मिळाला. देवेंद्र फडणवीस एक अभासू नेता म्हणून माझा समज होता मात्र बारसू। रिफायनरी संदर्भात त्यांचे डोळे एवढे झाकले का गेले, हा प्रश्न आहे मला. देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्षात बारसु ला येऊन ग्रामस्थांशी बोला मग त्यांना कळेल त्यांची फसवणूक तुमची लोक करता की भुमाफियाचे दलाल करता की प्रशासन फसवणूक करत हे कळेल. तसेच पूर्ण माहिती घेण्याआधी बोलण म्हणजे अपरिपक्व पणाच लक्षण असल्याची टिका देवेंद्र फडणवीस यांच्यावर विनायक राऊत यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number