भारतीय जनता पार्टीची नवीन प्रदेश कार्यकारिणी बुधवारी जाहीर होणार असून, राज्यातील केंद्रीय नेतृत्व विशेष निमंत्रित या सर्वांची मिळून जवळपास १२०० जणांची ही कार्यकारिणी असणार आहे. आगामी निवणूक लक्षात घेता अनेक
जिल्हाध्यक्ष बदलाचे, नव्या लोकांना संधी मिळण्याचे संकेत आहेत.
भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी १२ ऑगस्ट २०२२ ला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर भाजपच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा अपेक्षित होती. पण त्याला मुहूर्त मिळत नव्हता. अखेर आता भाजपनं मिशन २०२४ डोळ्यांसमोर ठेवून नवीन जम्बो कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार आहे.
चंद्रशेकर बावनकुळे म्हणाले की, ‘या कार्यकारिणीच्या माध्यमातून २०२४ च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज असणार आहोत.’ ‘त्यात ४८ लोकसभा आणि २०० हून अधिक विधानसभा युतीत जिंकण्याचा निर्धारही बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.’