अमरावती बाजार समितीच्या निवडणुकीच्या विजयानंतर काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्यावर सडकून टीका केली होती. हनुमान चालीसाचा गैरवापर केला आहे. अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केल्यानंतर यावर आमदार रवी राणा यांनी पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया दिली.
'सत्तेचा वापर शेतकरी हितासाठी करावा'
'हनुमानजी आमच्या हृदयात आहे'
यशोमती ठाकूरांच्या टीकेवर रवी राणांची प्रतिक्रिया#Jaimaharashtranews #Marathinews #Maharashtra @AdvYashomatiINC @INCMaharashtra @INCIndia @MLARaviRana @BJP4Maharashtra @BJP4Mumbai — JAI MAHARASHTRA NEWS (@jaimaharashtran) April 29, 2023
हनुमानजी आमच्या हृदयात आहे. महाविकास आघाडी सरकारने मला हनुमान चालीसा म्हटलं म्हणून जेलमध्ये टाकलं होतं. हनुमान जी माझे दैवत आहे. मी ज्या ज्या वेळी शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं त्यावेळी यशोमती ठाकूर यांनी मला जेलमध्ये टाकलं. बाजार समितीमध्ये यशोमती ठाकूर यांना सत्ता मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी सत्तेचा वापर शेतकरी हितासाठी करावा. शेतकरी हिताची निर्णय घ्यावेत. तसेच सहकार क्षेत्रात माझी पहिली एन्ट्री होती मला याचा अनुभव नव्हता अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली.v