‘उद्धव ठाकरेंचं भाषण रटाळ होतंय’

उद्धव गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी पाचोऱ्यात सभा झाली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. मोदींचा एकेरी उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले. तुला आगे ना पिछे. तुला कोणी नाहीये. कधी झोळी लटकवशील आणि निघून जाशील. पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय? या टीकेनंतर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल […]

‘उद्धव ठाकरेंचं भाषण रटाळ होतंय’

उद्धव गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी पाचोऱ्यात सभा झाली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. मोदींचा एकेरी उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले. तुला आगे ना पिछे. तुला कोणी नाहीये. कधी झोळी लटकवशील आणि निघून जाशील. पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय? या टीकेनंतर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. पंतप्रधानांची लोकप्रियता वाढत असल्याने ठाकरेंची निराशा वाढत असून तीच निराशा त्यांच्या तोडून बाहेर पडत असल्याचा टोला फडणवीसांनी लगावला.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उटलं. उद्धव ठाकरेंच्या भाषणात निराशा आणि तोच तो पणा होता. एकही नवीन मुद्यावर उद्धव ठाकरे बोलले नाहीत. काही नेते फक्त शिवराळ भाषा वापरतात. राज्याच्या विकासावर एक शब्दही बोलत नाहीत.

शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन कसं येईल. रोजगार निर्मिती कशी होईल. यावर ते बोलत नाहीत. त्यांच्या राजकीय जीवनात ते एक विकासाचा प्रकल्प करु शकले नाहीत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढत असल्याचं दिसत आहे. म्हणून उद्धव ठाकरेंची निराशा वाढत आहे. तीच निराशा उद्धव ठाकरेंच्या तोंडून बाहेर येत आहे. असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number