दादांच्या दाव्याने मविआत खळबळ

सकाळ समूहाला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी मोठा दावा केला. २०२४ला नाही तर आताही मुख्यमंत्रिपदावर दावा करू शकतो, असे अजित पवार म्हणाले होते.अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्य नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, अजित पवारांच्या या विधानावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी […]

दादांच्या दाव्याने मविआत खळबळ

सकाळ समूहाला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी मोठा दावा केला. २०२४ला नाही तर आताही मुख्यमंत्रिपदावर दावा करू शकतो, असे अजित पवार म्हणाले होते.अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्य नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, अजित पवारांच्या या विधानावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

अजित पवारांकडे १४५ आमदारांचे संख्याबळ असेल तर त्यांनी मुख्यमंत्री व्हावे.सारखे सारखे मी मुख्यमंत्री बनतो, असे सांगण्याची काहीही गरज नाही. वास्तविक पाहता आज राज्यात अनेक मोठे प्रश्न आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. खारघरमध्ये श्रीसेवकांचा मृत्यू झाला. वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त आहे. बेरोजगारी वाढत चालली आहे, त्यामुळे अशा राजकीय विषयांकडे लक्ष देण्यापेक्षा या मुद्द्यांकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर त्यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. तिसऱ्या दिवशी पुन्हा ते पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळे माध्यमांनाही यातले किती माहिती हे त्यांनाच माहिती, असेही ते म्हणाले.

दरम्यान, २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार असतानाही आमदारकीचा अनुभव नसलेल्या पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात नाईलाजानेआपण काम केले, असे पवार म्हणाले होते. याबाबात नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवारांनी नाईलाज हा शब्द वापरण्यापेक्षा त्यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथच घ्यायला नको होती. उपमुख्यमंत्री पदावर बसून खदखद निर्माण करण्यापेक्षा बाहेर राहून खदखद व्यक्त करायला हवी होती. मुळात त्यांनी अशा प्रकारचे विधान करावं हे अपेक्षित नाही. त्यांनी नाईलाज शब्द वापरणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number