मुंबई : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आपल्या मनमोहक सौंदर्याने नेहमीच तिच्या चाहत्यांना भुरळ पाडता असते . परंतु बिग बॉस मराठी ४ फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिच्यावर आता दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. तिच्या धाकट्या भावाचे नुकतेच निधन झाले. ‘शेवंता’ या भूमिकेने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचा लहान भाऊ ओमकार नेमळेकर याचे नुकतेच निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा आकस्मित मृत्यू झाला. याबाबत अपूर्वा नेमळेकर हिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दुखःद बातमी शेअर केली.
या पोस्टला कॅप्शन देत अपूर्वाने लिहिले की, ‘”माझ्या लाडक्या भावा जिथे असशील तिथे आनंदात राहा. कधीकधी आयुष्यात अशी दुःख सहन करावी लागतात. तुला गमावणे ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात दुखःद गोष्ट आहे . तुला गुडबाय म्हणणं मला जमणार नाहीये. कारण काही नाती कधीच तोडता येत नाहीत. मी तुझ्यावर नेहमीच प्रेम केलंय, करतेय आणि कायम करत राहीन . आशा आहे की, आपण पुन्हा नक्कीच भेटू.”
अपूर्वाची ही भावनिक पोस्ट पाहून सिनेसृष्टीतील अनेक कलावंत तसेच तिच्या चाहत्यांनी अपूर्वाच्या भावाला श्रद्धांजली वाहिली आहे. लवकरच अपूर्वा नेमळेकर बिग बॉस मराठी ४ नंतर रावरंभा या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे .