दादा बोलेना, दादा चालेना ?

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची आणि भाजप ची जवळीकता वाढल्याच्या बातम्या येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पर्यायी सरकार देण्याची वेळ आल्यास त्यात अजित पवार भाजपसोबत जाऊ शकतात अशी शक्यता वर्तविली जात असताना अशातच आता नागपूरमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेत अजित पवार भाषण करणार नसल्याची माहिती समोर आली […]

दादा बोलेना, दादा चालेना ?

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची आणि भाजप ची जवळीकता वाढल्याच्या बातम्या येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पर्यायी सरकार देण्याची वेळ आल्यास त्यात अजित पवार भाजपसोबत जाऊ शकतात अशी शक्यता वर्तविली जात असताना अशातच आता नागपूरमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेत अजित पवार भाषण करणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

महाविकास आघाडीची १६ एप्रिल रोजी नागपुरात मविआची वज्रमूठ सभा होणार आहे. या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेमध्ये एक सूत्र मांडण्यात आलेला आहे. नागपुरातील वज्रमूठ सभा यशस्वी करण्याची जबाबदारी शरद पवारांनी अनिल देशमुख यांच्यावर टाकली असून अनिल देशमुख यांनीच सभेत बोलावे असे नेतृत्वाचे म्हणणे असल्याचे पक्षांतर्गत सूत्रांची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक पक्षाकडून फक्त २ वक्ते भाषण करणार आहेत. म्हणजे ६ जणांचं भाषण या सभेत होणार आहे. या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं भाषण होणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील आणि विदर्भातील मोठे नाव, महत्वाचा चेहरा म्हणून देशमुख यांचं भाषण होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांचं भाषण का नाही असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number