‘राष्ट्रवादीबाबत शिंदे प्रयोग ‘

एकनाथ शिंदे व संपूर्ण शिंदे गट ईडीच्याच भीतीने भाजपसोबत गेला, असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेससोबतही हाच प्रयोग सुरू आहे, असा गौप्यस्फोट उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या जवळकीची चर्चा रंगली असतानाच नेमके कोण कोणासोबत? याबाबत आणखी संभ्रम निर्माण झाला आहे. तुरुंगात जाण्याच्या भीतीने एकनाथ शिंदे हे […]

‘राष्ट्रवादीबाबत शिंदे प्रयोग ‘

एकनाथ शिंदे व संपूर्ण शिंदे गट ईडीच्याच भीतीने भाजपसोबत गेला, असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेससोबतही हाच प्रयोग सुरू आहे, असा गौप्यस्फोट उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या जवळकीची चर्चा रंगली असतानाच नेमके कोण कोणासोबत? याबाबत आणखी संभ्रम निर्माण झाला आहे.

तुरुंगात जाण्याच्या भीतीने एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येऊन रडले होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केल आहे. तसेच, आपण भाजपमध्ये गेलो नाही तर तुरुंगात जाऊ, अशी भीतीही मातोश्रीवर एकनाथ शिंदेंनी वर्तवली होती, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. त्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतचे 40 आमदार हे ईडीच्या भीतीनेच भाजपसोबत गेले. ईडीच्या भीतीनेच त्यांनी शिवसेनेत बंड केले आहे. त्यांचा हिंदुत्वाचा दावा धादांत खोटा आहे.

शिंदे गटाला ज्याप्रमाणे ईडीची भीती दाखवून बंड करायला लावले, तसाच प्रयोग सध्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना विविध प्रकरणांची भीती दाखवून त्रास दिला जात आहे, असा गौप्यस्फोट पुढे संजय राऊतांनी केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोण फुटणार किंवा कोणत्या नेत्याच्या नेतृत्वाखाली बंड होणार?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number