सिल्वर ओक या निवासस्थानी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा भेटी संदर्भात अनेक तर्क वितर्क केले जात होते त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून आता उद्धव गटातील खासदार संजय राऊतांनी देखील संधर्भात वक्तव्य केले आहे.
राऊत म्हणाले की, “मविआमध्ये मतभेद नाहीत. शरद पवारांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ आणि महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत या बैठकीमध्ये राज्यातील आणि देशातील अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली.भविष्यातील दिशा ठरवण्यावर चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाली, शरद पवार देशाचे जेष्ठ नेते आहेत अनेक विषय चर्चेमध्ये होते.” “शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. या बैठकीत सुप्रिया सुळे देखील होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरे आता काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. याबद्दल राऊतांनी माहिती दिली. “काँग्रेसचे के.सी. वेणूगोपाळ येत आहेत. त्यांनी उद्धवजींची वेळ मागितली आहे. पुढील दोन दिवसांत मल्लिकार्जून खरगे यांच्यावतीने वेणूगोपाळ हे मातोश्रीवर येऊन चर्चा करतील. शरद पवारांबरोबर जशी चर्चा झाली, तशी काँग्रेसच्या नेत्यांसोबत होईल. महाविकास आघाडी, राष्ट्रीय स्तरावर विरोधकांचं ऐक्य हा आमच्यासमोरचा महत्त्वाचा मुद्दा आहे”, असं संजय राऊत म्हणाले.