महाराष्ट्रातील राजकारणात अनेक नेत्यांना धमकीचे फोन येत आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कारागृहातून धमकीचा फोन आला होता. त्यानंतर उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनाही फोनद्वारे धमकी देण्यात आली. आता, थेट मुख्यमंत्री शिंदे यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
पुण्यातील वारजे येथून मुख्यमंत्री शिंदे यांना धमकीचा फोन आला आहे. या फोनद्वारे मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. थेट मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन आल्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. दरम्यान, धमकी देणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आरोपीने मद्यपेयच्या नेशत फोन केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत.