जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर
मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर पोलिसांचा पोग्रेस रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला.
एकीकडे नागपूर क्राईम कॅपिटल होत असल्याची टीका होत असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र यावेळी पोलिसांची पाठ थोपटली आहे.
मागील तीन वर्षातील पोलिसांच्या कामगिरीच्या आधारावर हा रिपोर्ट बनवण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलताना नागपूरच्या गुन्हेगारीचे खापर मीडियावर तर
फोडलेच शिवाय नागपूरची घटना म्हणजे राष्ट्रीय गुन्हा घडल्यासारखे दाखवलं जातं असा आरोपही त्यांनी केला.