‘या मागचा मास्टरमाईंड कोण याचा शोध घ्यावा’

शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक मॉर्फ केलेला आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये उद्धव गटाचे दोन कार्यकर्ते तर एक काँग्रेस कार्यकर्ता असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले आहे. याप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात […]

‘या मागचा मास्टरमाईंड कोण याचा शोध घ्यावा’

शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक मॉर्फ केलेला आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये उद्धव गटाचे दोन कार्यकर्ते तर एक काँग्रेस कार्यकर्ता असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले आहे. याप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच हा व्हिडिओ ‘मातोश्री’नावाच्या एका पेजवरुन शेअर आणि व्हायरल केल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. ”व्हिडिओ व्हायरल प्रकरणाचा मास्टर माईंड कोण? याचा शोधही लवकरच घेतला जाईल”, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

म्हात्रे म्हणाल्या की, ”आम्ही शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आम्हाला अनेक वेळा वाईट बोललं जातं. अनेक वेळा आमच्यावर आरोप-प्रत्यारोप केले जातात. मात्र, काल एका कार्यक्रमात असताना एक व्हिडिओ मॉर्फ करून व्हायरल करण्यात आला. हा व्हिडिओ मातोश्री या पेजवरून व्हायरल आणि शेअर करण्यात आला. या व्हिडिओला एका तासात जवळपास ३०० पेक्षा जास्त शेअर करण्यात आले होते. एखादी महिला चांगल काम करत असेल, तर तिचे अशा पद्धतीने चारित्र्य हनन केलं जातं. उद्धव गटाच्या आयटी सेलकडूनच हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला”, असा आरोपही शीतल म्हात्रे त्यांनी केला.

“कोणीतरी इतक्या खालच्या पातळीवरचा विचार कसं करू शकतं? जी कोणाची तरी आई आहे, बहिण आहे, बायको आहे. हे कोण आहे याची सर्वांना कल्पना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या स्त्रीला अशापद्धतीने बदनमा केलं जातं. बहिण-भावाचं नातं असलेल्या एखाद्या स्त्रीला आणि पुरुषाला अशा पद्धतीने समाज विकृत नजरेने पाहतोय यामागे कोणाचं डोकं आहे हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. त्यांच्याकडे काहीच करण्यासारखं नाहीय म्हणून ते एवढ्या पातळीपर्यंत आले आहेत,” अशी प्रतिक्रिया शीतल म्हात्रे यांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number