मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘निवडणूक आयोगाचा निर्णय आमच्या बाजूने आल्याने उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आम्ही जे धडाकेबाज निर्णय घेतोय त्यामुळे ते घाबरलेले आणि बिथरलेले आहे त्यामुळे आमच्यावर आरोप करत आहे. पण आम्ही कामाने उत्तर देऊ, त्यातून ते आमच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. आम्हाला कुणाच्याही संपत्तीचा मोह नाही, आम्हाला कुणाची संपत्ती नकोय, बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती असल्याचे’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला धनुष्यबाण दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिफ्ट दिलेला होता. पण दिलेलं काढायची मला सवय नाही, असा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. एकनाथ शिंदे म्हणाले, आम्हाला कुणाचीही संपत्ती नको. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
‘बाळासाहेबांनी देव्हाऱ्यात ठेवून पुजा केलेला धनुष्यबाण दाखवून उद्धव ठाकरे भावनिक राजकारण करत आहेत. बाळासाहेबांना तो बाण मी दिला होता, पण दिलेल्या गोष्टी कधी मी काढत नाही. त्यावर काही बोलणार नाही. मला बोलायला लावू नका, मी बोललो तर अनेकांची अडचण होईल,’ असा इशारा देखील शिंदेंनी दिला.