ठाकरेंची पुढची भूमिका काय ?

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. या आदेशाने उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेल्या तीन दिवसांपासून सुप्रीम कोर्टात सलग सुनावणी सुरु होती. पण सत्तासंघर्षावर येत्या मंगळवारी सुनावणी करण्यात येणार असल्याचे सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले आहे. पण त्याआधीच निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि […]

ठाकरेंची पुढची भूमिका काय ?

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. या आदेशाने उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेल्या तीन दिवसांपासून सुप्रीम कोर्टात सलग सुनावणी सुरु होती. पण सत्तासंघर्षावर येत्या मंगळवारी सुनावणी करण्यात येणार असल्याचे सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले आहे. पण त्याआधीच निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले आहे.

यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला संताप व्यक्त केला. यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगावर देखील निशाणा साधला. आता उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पक्षाची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व आमदार, खासदार आणि नेते सहभागी होणार आहेत. दुपारी एक वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार आहे. शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? यावर शिंदे-ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरु होती.

या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर या बैठकीत पुढील भूमिका काय असेल, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी परिसरातील आमदार, खासदार तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. 21 फेब्रुवारीपासून सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number