बाळासाहेब ठाकरे यांनी पहिलं महाअधिवेशन नाशिकमध्ये घेतलं होतं. नाशिक हे एक पवित्र ठिकाण आहे. नाशिकच्या रामकुंडात सगळी पापं बुडवली जातात. भाजपलाही आम्ही इथेच बुडवू असा हल्लाबोल संजय राऊत यांनी भाजपवर केला. नाशिकमध्ये भगवाच फडकणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत नाशिकवर कमळ फुलणार, असा नारा देखील यावेळी देण्यात आला.
यावर संजय राऊत म्हणाले की, नारा देऊ दे त्यांना, मात्र नाशिकवर भगवाच फडकणार हे लिहून घ्या. बाळासाहेब ठाकरे यांचे नाशिकवर अतीव प्रेम होते. बाळासाहेबांचे जे स्वप्न नाशिकच्या संदर्भात होतं ते नाशिक उद्धवस्त करणार नाही. गिरीश महाजन सारख्या लोकांनी नाशिकमध्ये जी परिस्थिती निर्माण केली आहे, त्याचा लोकांना वीट आला आहे. लोक त्याचा तिरस्कार करता आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी पहिलं महाअधिवेशन नाशिकमध्ये घेतलं होतं. आणि त्यांनाही आशिर्वाद नाशिकने दिला. भाजपला आम्ही याच नाशिकमध्ये बुडवू असे संजय राऊत म्हणाले.