रविकांत तुपकर यांना जामीन मंजूर

तुपकरांसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना नायालायानं अटी-शर्थींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. आत्मदहन आंदाेलन छेडल्याप्रकरणी अकाेला कारागृहात न्यायालयीन काेठडीत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संघटक रविकांत तुपकर यांना आज न्यायालयात दिलासा मिळाला आहे. तुपकरांसह 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. हे सर्वजण अकोला न्यायालयीन कोठडीत आहेत. आज संध्याकाळी या सर्वांची सुटका होण्याची शक्यता आहे. रविकांत तुपकर यांनी […]

रविकांत तुपकर यांना जामीन मंजूर

तुपकरांसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना नायालायानं अटी-शर्थींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. आत्मदहन आंदाेलन छेडल्याप्रकरणी अकाेला कारागृहात न्यायालयीन काेठडीत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संघटक रविकांत तुपकर यांना आज न्यायालयात दिलासा मिळाला आहे. तुपकरांसह 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. हे सर्वजण अकोला न्यायालयीन कोठडीत आहेत. आज संध्याकाळी या सर्वांची सुटका होण्याची शक्यता आहे.

रविकांत तुपकर यांनी 11 फेब्रुवारीला बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर जाऊन, पोलिसी वेशात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर परिस्थिती आणखी चिघळेल म्हणून पोलिसांनी तुपकरांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर पोलिस आणि कार्यकर्ते यांच्या संघर्ष झाला होता. त्यामुळे एकच गाेंधळ उडाला हाेती. त्यानंतर पाेलिसांनी तुपकर यांना ताब्यात घेत न्यायालयात हजर केले हाेते. न्यायालयाने त्यांना आणि त्यांच्या सहका-यांना 14 दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली हाेती.

रविकांत तुपकर यांनां न्यायालयीन कोठडी सुनावल्याने पाेलिसांनी त्यांची रवानगी अकाेला कारागृहात केली. तेथे देखील तुपकर यांनी त्यांचे अन्न त्याग आंदोलन सुरूच ठेवले. 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, आत्मदहन आंदोलनाच्या दणक्यानं 42 कोटी रुपयांची पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला यश आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number