राऊतांचा फडणवीसांना प्रश्न

संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी नाशिकमधून पुन्हा शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. याचबरोबर त्यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. महाविकास आघाडी पूर्ण मार्काने पास होईल, मतदारांमध्ये कमालीचा संताप आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत तो दिसून येईल. अंधेरीमध्ये शिवसेनेचा मोठा विजय झाला होता. भाजपाने मतदारांना कायम गृहीत धरले आहे. […]

राऊतांचा फडणवीसांना प्रश्न

संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी नाशिकमधून पुन्हा शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. याचबरोबर त्यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. महाविकास आघाडी पूर्ण मार्काने पास होईल, मतदारांमध्ये कमालीचा संताप आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत तो दिसून येईल. अंधेरीमध्ये शिवसेनेचा मोठा विजय झाला होता. भाजपाने मतदारांना कायम गृहीत धरले आहे. महाराष्ट्राच्या मतदारांना आता गृहीत धरता येणार नाही. याचा फटका भाजपला बसेल. सामान्य माणूस भाजपावर नाराज असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मविआ सरकारमध्ये माझ्या अटकेचा डाव रचण्यात आल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला. फडणवीसांच्या या दाव्यावरून खासदार संजय राऊतांनी टोला लगावला आहे. आम्ही वाघाच्या जबड्यात हात घालणारे आहोत असं फडणवीस जुन्या भाषणांमध्ये म्हणायचे. याचाच दाखला देत संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला. वाघाच्या जबड्यात हात घालणारे फडणवीस अटकेला घाबरत होते?, असा सवाल केला. संजय राऊत यांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number