‘महाराष्ट्राची सुटका झाली’

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांसारख्या वंदनीय व्यक्तींबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेपार्ह विधाने केल्यानंतर त्यांना राज्यपाल पदावरून हटविण्याची मागणी विरोधकांनी केली होती. कोश्यारी यांनी केलेल्या बेजबाबदार विधानांमुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्यानंतर अनेक ठिकाणी कोश्यारींच्या विरोधात आंदोलने करण्यात आली होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची कोंडी झाली होती. महाराष्ट्रातून कोश्यारी हटाव या मोहिमेला लोकांनीही पाठिंबा […]

‘महाराष्ट्राची सुटका झाली’

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांसारख्या वंदनीय व्यक्तींबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेपार्ह विधाने केल्यानंतर त्यांना राज्यपाल पदावरून हटविण्याची मागणी विरोधकांनी केली होती. कोश्यारी यांनी केलेल्या बेजबाबदार विधानांमुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्यानंतर अनेक ठिकाणी कोश्यारींच्या विरोधात आंदोलने करण्यात आली होती.

त्यामुळे भारतीय जनता पक्षाची कोंडी झाली होती. महाराष्ट्रातून कोश्यारी हटाव या मोहिमेला लोकांनीही पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे राजकीय दबाव वाढत चालला होता. या पार्श्वभूमीवर आपल्याला पदमुक्त करण्याची विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई दौऱ्यादरम्यान केली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ही मागणी मान्य झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देखील राज्यपालांच्या राजीनाम्यावर मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली. हा अतिशय चांगला निर्णय आहे. पण हा निर्णय आधीच घेतला पाहिजे होता. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच राज्यपाल पदावर अशी व्यक्ती पाहिली. केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी त्यात बदल केला, ही समाधानकारक बाब आहे. महाराष्ट्राला उच्च दर्जाचे व्यवहार असणाऱ्या व्यक्ती राज्यपाल म्हणून मिळाले होते असे सांगत त्यांनी कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते मानले महाराष्ट्रात आतापर्यंत जे राज्यपाल झाले त्यांनी पक्ष बाजूला ठेवत राज्याच्या हितासाठी मार्गदर्शन केले. देशाची घटना अबाधित ठेवली. सतत चर्चेत राहणारे हे पहिले राज्यपाल आहेत. लोकांना त्यांच्यावर सतत टीका कारवाई लागते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number