वंदे भारत ट्रेन शिर्डीला पोहचली

मुंबईहून शिर्डी साठी दुपारी चारच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवत रवाना केलेली विशेष ट्रेन रात्री पावने दहा वा शिर्डीत पोहचली. या ट्रेनचं तुतारीच्या निनादात आणि ढोल ताशांच्या गजरात शिर्डीच्या साईनगर रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आल. शिर्डीला पहील्या वंदे भारत ट्रेन ने आलेल्या प्रवाशांच साईबाबा संस्थानच्या वतीने गुलाब पुष्प आणि शॉल घालुन स्वागत […]

वंदे भारत ट्रेन शिर्डीला पोहचली

मुंबईहून शिर्डी साठी दुपारी चारच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवत रवाना केलेली विशेष ट्रेन रात्री पावने दहा वा शिर्डीत पोहचली. या ट्रेनचं तुतारीच्या निनादात आणि ढोल ताशांच्या गजरात शिर्डीच्या साईनगर रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आल. शिर्डीला पहील्या वंदे भारत ट्रेन ने आलेल्या प्रवाशांच साईबाबा संस्थानच्या वतीने गुलाब पुष्प आणि शॉल घालुन स्वागत करण्यात आल.

सीएसएमटी ते शिर्डी हा टप्पा वंदे भारत ट्रेन अवघ्या पाच तास २० मिनिटांत पार करणार आहे. त्यामध्ये मुंबई ते नाशिक हे अंतर अवघे दोन तास 37 मिनिटांत पूर्ण करणार आहे. त्यामुळे जलद वेगाने धावणारी ही ट्रेन आकर्षणाचा विषय ठरत आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही नाशिकरोड रेल्वेस्थानकावर दोन मिनिटे थांबणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेत चढतांना आणि उतरतांना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे काही प्रवाश्यांनी ही वेळ वाढवून देण्याची मागणी सुरू केली आहे. वंदे भारत ट्रेन नाशिकसाठीही सुरू व्हावी अशी मागणी नाशिककरांकडून केली जात होती. आज अखेर त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेल्या दोनपैकी एका वंदे भारतचा थांबा नाशिकरोडला आहे.

मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ६.२० वाजता सीएसएमटीहून सुटेल आणि ५ तास २० मिनिटांनी साईनगर शिर्डी येथे सकाळी ११.१० वाजता पोहोचेल. ही गाडी सीएसएमटी येथून सुरू होऊन दादर, ठाणे, नाशिकरोड स्थानकावर थांबेल. तर साईनगर शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस साईनगर शिर्डी येथून सायंकाळी ५.२५ वाजता सुटेल आणि ५ तास २५ मिनिटांनी मुंबईला रात्री १०.५० वाजता पोहोचेल. ही गाडी मंगळवारी मुंबई आणि शिर्डीहून धावणार नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number