जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपाचं आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आव्हाड म्हणाले की, मुघलशाही नसती तर शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा इतिहासच लिहिला गेला नसता. यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज भाजपा युवा मोर्चाच्या आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईमधील प्रदेश कार्यालयावर चालून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही कार्यालयाबाहेर जमले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत […]

जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपाचं आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आव्हाड म्हणाले की, मुघलशाही नसती तर शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा इतिहासच लिहिला गेला नसता. यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज भाजपा युवा मोर्चाच्या आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईमधील प्रदेश कार्यालयावर चालून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही कार्यालयाबाहेर जमले होते.

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत भाजपाच्या कार्यकर्त्यांना थोड्या दूरवरच रोखून ठेवले. पोलिसांनी रोखल्यानंतर भाजपाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पुतळा नष्ट करुन तो जाळू दिला नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजपाचा निषेध केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number