केंद्र सरकारचा निवडणूकपूर्वी शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आज सादर करण्यात येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नुकतेच लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये चालू आर्थिक वर्षात जीडीपीचा दर सुमारे 7 टक्के राहण्याचा अंदाज असल्याचं त्यांनी सांगितले. भारताकडून G20 अध्यक्षपद ही खूप मोठी संधी असून रोजगाराच्या संधी कशा वाढवता येतील यावर सरकारचा भर असणार आहे.
हैदराबादच्या श्रीअन्न रिसर्च सेंटरला विशेष अनुदान सहकार मॉडेलला येत्या काळात प्राधान्य देण्यात येणार आहे. तर महत्त्वाच्या ठिकाणी 157 नर्सिंग कॉलेजेस सुरु होणार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या अर्थसंकल्पात सांगितले आहे.
अमृत काळासाठी टेक्नोलॉजी आणि ज्ञान आधारित अर्थव्यवस्था आमचं लक्ष्य आहे. सबका साथ, सबका प्रयासच्या साथीने जनभागीदारी साध्य करणं महत्त्वाच आहे असं सीतारमण म्हणाल्या. मुलांसाठी आणि तरुणांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी स्थापन करण्यात येणार आहे तर पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय यावर लक्ष केंद्रित करून कृषी कर्जाचे लक्ष्य 20 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवले जाईल.