“केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू”

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या (कोल्हापूर) कागल येथील घरांवर ईडीने छापे टाकले आहेत. कागल शहरातील माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाच वेळी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. त्यावर उद्धव गटाचे खासदार यांनी […]

“केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू”

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या (कोल्हापूर) कागल येथील घरांवर ईडीने छापे टाकले आहेत. कागल शहरातील माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाच वेळी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. त्यावर उद्धव गटाचे खासदार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, ‘भाजप विरोधी विचारांच्या नेत्यांवर काही वर्षांपासून धाडी टाकल्या जात आहेत. तपास यंत्रणांचा वापर करुन भाजपकडून दबावाचे राजकारण करण्यात येत आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, पुणे येथील घरांवर आज ईडीची धाड पडली. त्यावरुन संजय राऊतांनी भाजपवर तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याची टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ हे लढवय्ये नेते आहेत. हसन मुश्रीफ या सर्व संकटातून सुखरुप बाहेर येतील. आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत, असेही संजय राऊत म्हणाले. मुश्रीफांना तुरूंगात टाकण्याची भाषा काही लोकांनी याआधी केली होती. सरकारमध्ये सामील झालेल्या लोकांना दिलासा मिळतो आणि जे विरोधी पक्षात आहेत त्यांच्याविरोधात दबावाचे राजकारण केले जाते. मुश्रीफ लढवय्ये, संघर्ष करणारे, संकटाशी सामना करणारे नेते असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number