मार्डच्या संपामुळे रुग्णसेवा कोलमडली

राज्यभरातील जवळपास सात हजार निवासी डॉक्टर सलग दुसऱ्या दिवशी देखील संपावरच आहेत. त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. या डॉक्टरांना संप मागे घेण्याचं आवाहन सरकार मार्फत करण्यात येत आहे. मात्र मार्डचे डॉक्टर संपावर ठाम आहेत. वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या एक हजार ४३२ जागांची पदनिर्मिती करावी अशी मागणी या संपकरी कर्मचाऱ्यांची आहे. तसेच शासकीय रुग्णालयं आणि महाविद्यालयांत नवी […]

मार्डच्या संपामुळे रुग्णसेवा कोलमडली

राज्यभरातील जवळपास सात हजार निवासी डॉक्टर सलग दुसऱ्या दिवशी देखील संपावरच आहेत. त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. या डॉक्टरांना संप मागे घेण्याचं आवाहन सरकार मार्फत करण्यात येत आहे. मात्र मार्डचे डॉक्टर संपावर ठाम आहेत. वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या एक हजार ४३२ जागांची पदनिर्मिती करावी अशी मागणी या संपकरी कर्मचाऱ्यांची आहे. तसेच शासकीय रुग्णालयं आणि महाविद्यालयांत नवी वसतीगृहं बांधावीत , सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यापकांची अपुरी पदं तातडीनं भरावीत, महागाई भत्ता तात्काळ देण्यात यावा आणि निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करावं अशा निवासी डॉक्टरांच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत. या मागण्यांसाठी या डॉक्टरांनी संप पुकारकला आहे.

या संपाचा सर्वात मोठा परिणाम रुग्णांवर होत आहे. कारण मुंबईतील सुमारे 2 हजार आणि राज्याच्या उर्वरित भागातील सुमारे 6 हजार निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे ओपीडी तसेच ऑपरेशन्सशी संबंधित कामकाजावर या संपाचा परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील २२ सरकारी रुग्णालयातील सुमारे ८ हजार निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. त्यामुळे सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय सेवा ठप्प झाली आहे.

सेन्ट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना मागण्यांचे पत्र देण्यात आले आहे. विविध मागण्यांसाठी मागील एका वर्षापासून मंत्र्यांसोबतच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका होऊनही प्रतिसाद न दिल्याने निवासी डॉक्टरांनी सोमवार पासून संप सुरु केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number