जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मालिका आणि चित्रपट कामगारांनी संप पुकारला आहे. मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटीबाहेर दुसऱ्या दिवशीही आंदोलन करण्यात आलं. फिल्मसिटीच्या गेटजवळ कामगारांनी चक्का जाम आंदोलन केलं. यात 21 संघटनांचे कामगार सहभागी झाले. 2015 पासूनच्या कामगारांच्या या मागण्या आहेत.
मात्र, त्या अद्यापही पूर्ण न झाल्यानं कामगारांनी आता चक्का जाम आंदोलन केलं. दरम्यान, या आंदोलनाला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळानं विरोध केला. जर कुणी चित्रिकरणात अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्वरित महामंडळाला कळविण्याचे आवाहन महामंडळानं केलं. तसंच महामंडळाचे भरारी पथकही चित्रिकरण स्थळी लक्ष ठेवून आहे.
कामगारांच्या या आहेत मागण्या-
योग्य वेतन वाढ द्या
कामाचे 8 तास करा
सर्व कामगारांची विमा पॉलिसी काढा
चांगले जेवण द्या
स्वच्छ टॉयलेट, बाथरूमची सोय करा
सुरक्षा उपकरणे द्या
कायमस्वरूपी नोकरीची हमी द्या
चित्रपट कामगारांच्या या आंदोलनात तब्बल 22 संघटनांचा सहभाग आहे.
मेकअप, हेअर असोसिएशन, साऊंड असोसिएशन
प्रोडक्शन असोसिएशन, कॅमेरामन असोसिएशन
ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशन, कॉस्ट्युम असोसिएशन
लाईट असोसिएशन, स्पॉट बॉय असोसिएशन
आर्ट डिपार्टमेंट, स्टील असोसिएशन
एडिटर असोसिएशन, म्युझिक असोसिएशन
फायटर असोसिएशन, डान्सर असोसिएशन