नागपूर शहरात मुसळधार पाऊस सुरूच

नागपूर शहरात गेल्या दोन-तीन दिवसापासून होत असलेल्या चांगल्या पावसाने शहरातील सर्व तलाव तुडुंब भरली आहेत. अंबाझरी तलाव देखील पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे तलावाच्या ओवर फ्लो पॉईंट पासून पाण्याचा मोठा विसर्ग होतो आहे. काही वर्षाआधी नागपूर महानगरपालिकेकडूनओवर फ्लो पॉईंट येथे स्वामी विवेकानंद यांच्या स्मारक तयार करण्यात आला आहे. पाण्याचा विसर्ग होत असल्याने स्मारकाचे सौंदर्य अधिक […]

नागपूर शहरात मुसळधार पाऊस सुरूच

नागपूर शहरात गेल्या दोन-तीन दिवसापासून होत असलेल्या चांगल्या पावसाने शहरातील सर्व तलाव तुडुंब भरली आहेत. अंबाझरी तलाव देखील पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे तलावाच्या ओवर फ्लो पॉईंट पासून पाण्याचा मोठा विसर्ग होतो आहे. काही वर्षाआधी नागपूर महानगरपालिकेकडूनओवर फ्लो पॉईंट येथे स्वामी विवेकानंद यांच्या स्मारक तयार करण्यात आला आहे. पाण्याचा विसर्ग होत असल्याने स्मारकाचे सौंदर्य अधिक खोलून दिसत आहेत. दुपारपासून पावसाने विश्रांती घेतल्याने नागपूरकरांनी ओवर फ्लो पॉईंट वर गर्दी केली असून पावसाच्या वातावरणाचा आनंद घेत असल्याचा पाहायला मिळत आहे. यावर्षी ओव्हरफ्लो पॉईंट मध्ये स्विमिंग करण्यावर बंदी घालण्यात आली आहे

तर एकीकडे नागपुरात काल रात्रीपासून पावसाची संततधार कायम आहे. पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पूरसदृश्य परिस्थिती लक्षात घेता नागपुरातील काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो झाल्याने उत्तर नागपुरातील पिवळी नदीच्या काठावरील वस्तीत पाणी शिरले आहे. त्यामुळं नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number