राहुल गांधी यांची बुधवारी पण चौकशी

नॅशनल हेराल्ड प्रकरणी बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी अंमलबजावणी संचालनालय राहुल गांधी यांची चौकशी करणार आहे. राहुल गांधी ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आजही रस्त्यावर उतरून ईडीचा निषेध करत आहेत. पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी अनेक महिला कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. तत्पूर्वी, दुसऱ्या दिवशी राहुल गांधी […]

राहुल गांधी यांची बुधवारी पण चौकशी

नॅशनल हेराल्ड प्रकरणी बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी अंमलबजावणी संचालनालय राहुल गांधी यांची चौकशी करणार आहे. राहुल गांधी ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आजही रस्त्यावर उतरून ईडीचा निषेध करत आहेत. पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी अनेक महिला कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

तत्पूर्वी, दुसऱ्या दिवशी राहुल गांधी कारने तपास यंत्रणेच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यांच्यासोबत बहीण प्रियांका गांधीही होत्या. राहुल यांना सोडल्यानंतर प्रियांका तेथून निघून गेल्या. दोन्ही दिवस काँग्रेस कार्यालयाबाहेर झालेल्या गोंधळामुळे तेथे कलम 144 लागू करण्यात आले आहे.

 

नॅशनल हेरॉल्ड घोटाळ्यात राहुल गांधी कसे ?

यंग इंडिया कंपनीमध्ये राहुल आणि सोनिया यांचा प्रत्येकी ३८ टक्के हिस्सा

यंग इंडियाला एजेएल कंपनीकडून ९ कोटींचे समभाग

समभागच्या बदल्यात यंग इंडियाने कर्ज चुकवण्याचे वचन दिले.

समभागासोबत यंग इंडियाला नेशनल हेरॉल्डचे मालकी हक्क मिळाले.

कर्ज फेडण्यासाठी एजेएलला काँग्रेसने ९० कोटी दिले आणि नंतर कर्जमाफीही दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number