श्री विठ्ठलाची मूर्ती सुरक्षित

श्री विठ्ठलाची मूर्ती सुरक्षित असून रूक्मिणी मातेच्या पावलांना वज्रलेप करण्याची गरज असल्याचे भारतीय पुरातत्व विभागाचे प्रमुख श्रीकांत मिश्रा यांनी सांगितले. श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या मूर्तीची झीज झाल्यानंतर मूर्तीची पाहणी करण्यासाठी पुरातत्व विभागाचे पथक शनिवारी पंढरपूर मध्ये आले होते. रविवारी पहाटे काकड आरतीवेळी मिश्रा आणि त्यांच्या पथकाने दोन्ही मूर्तीची पाहणी केली. यावेळी मिश्रा यांनी श्री विठ्ठल […]

श्री विठ्ठलाची मूर्ती सुरक्षित

श्री विठ्ठलाची मूर्ती सुरक्षित असून रूक्मिणी मातेच्या पावलांना वज्रलेप करण्याची गरज असल्याचे भारतीय पुरातत्व विभागाचे प्रमुख श्रीकांत मिश्रा यांनी सांगितले. श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या मूर्तीची झीज झाल्यानंतर मूर्तीची पाहणी करण्यासाठी पुरातत्व विभागाचे पथक शनिवारी पंढरपूर मध्ये आले होते. रविवारी पहाटे काकड आरतीवेळी मिश्रा आणि त्यांच्या पथकाने दोन्ही मूर्तीची पाहणी केली. यावेळी मिश्रा यांनी श्री विठ्ठल मूर्तीवर व्रजलेप केला आहे. त्यामुळे विठ्ठल मूर्ती सुरक्षित आहे. रूक्मिणी मूर्तीच्या पावलावर वज्रलेप करण्याची गरज आहे.

पुरातत्व विभागाची रविवारची माहिती

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या मूर्तीची पाहणी औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. श्री रूक्मिणी मातेच्या चरणाचे टवके पडत असल्याचे वास्तव समोर आले होते. दोन वर्षापूर्वीच भारतीय पुरातत्व विभागाने पूर्णपणे अभ्यासून शास्त्रीय पद्धतीने ही प्रक्रिया केली होती. श्री विठ्ठल रूक्मिणी मूर्तीची झीज यापाठीमागे नित्योपचार, अभिषेक, पदस्पर्श दर्शन, गर्भगृहाची रचना तेथील तापमान या गोष्टी कारणीभूत असल्याचे भारतीय पुरातत्व विभाग यांनी सांगितले. औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्व विभागाचे पथक पहाटे तीन वाजता मंदिरात जाऊन श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या मूर्तीची पाहणी केली. झीज कशामुळे झाली याचा अहवाल सादर करणार असल्याचे पुरातत्व विभागाचे श्रीकांत मिश्रा यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number