जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
राज्याची उपराजधानी नागपुरात आमदार निवासात झालेल्या बलात्काराची घटना ताजी असतानाच आणखी एका तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
नागपूरच्या महिला सुधारगृहातून पळालेल्या चार मुलींपैकी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. नागपूरच्या महिला सुधारगृहातून 20 एप्रिल रोजी चार मुलींनी पळ काढला होता.
त्यातील एका अल्पवयीन मुलगी भूक लागली म्हणून 21 एप्रिलला सीताबर्डी चौकात फिरत होती. त्यावेळी फिरोज अहमद, स्वप्नील जवादे, मयूर बरसागडे आणि अतुल जनबंधू या नराधमांची नजर तिच्यावर पडली.
त्यांनी तिला रिक्षात बसवलं आणि सुगत नगरमधल्या पडक्या इमारतीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि दुसऱ्या दिवशी सीताबर्डी चौकात सोडले. या प्रकरणी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बलात्कार करणारे 4 नराधम आणि त्यांना मदत करणारे दोघं अशा 6 जणांना अटक करण्यात आली आहे.