रेखा आणि सचिन यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, अन्यथा… सपा खासदाराची मागणी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   राज्यसभेचे खासदार असलेले मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा यांच्या अनुपस्थितीवरुन राज्यसभेत गोंधळ झाला.   रेखा आणि सचिन यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, अन्यथा विजय माल्ल्याप्रमाणे संसदेनंच दोघांना निलंबित करावे अशी मागणी समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी केली.   मार्च महिन्यातही अग्रवाल यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. क्रीडा, […]

रेखा आणि सचिन यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, अन्यथा… सपा खासदाराची मागणी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

राज्यसभेचे खासदार असलेले मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा यांच्या अनुपस्थितीवरुन राज्यसभेत गोंधळ झाला.

 

रेखा आणि सचिन यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, अन्यथा विजय माल्ल्याप्रमाणे संसदेनंच दोघांना निलंबित करावे अशी मागणी समाजवादी पक्षाचे

खासदार नरेश अग्रवाल यांनी केली.

 

मार्च महिन्यातही अग्रवाल यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. क्रीडा, चित्रपट अशा विविध क्षेत्रातील 12 मान्यवरांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात येते.

 

मात्र, ते वारंवार अनुपस्थित राहत असल्यास, त्यांना या क्षेत्रात रस नसावा. त्यामुळे अशा व्यक्तींनी राजीनामा द्यावा, असे अग्रवाल यांनी म्हटले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number