जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर करण्याच्या डेडलाईनसाठी अवघे काही तास उरले आहे.
त्यामुळे आज सर्व उरलेल्या उत्तरपत्रिका तपासून सोमवारी निकाल जाहीर करण्याचं आव्हान मुंबई विद्यापीठासमोर आहे.
आॅफलाइन पद्धतीने उत्तरपत्रिका तपासणी केली जात असताना, एप्रिल अथवा मे महिन्यात उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू व्हायची.
मात्र, यंदा ऑनलाईन पद्धतीने उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेतला. निविदा प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यानं उत्तरपत्रिका तपासणीसाठी जून महिना उजाडला
होता. त्यामुळे राज्यपालांनी 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले.
निकाल वेळेत लागावे म्हणून मुंबई विद्यापीठानं महाविद्यालयांना सुटी दिली होती. त्यामुळे मुंबई विद्यापीठ दिलेल्या वेळेत निकाल देणार का याकडे आता लक्ष
लागले.