जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार घटनेतील पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आरोपींकडून पीडित कुटुंबावर दबाव आणल्याचा आरोप राज्य महिला आयोगाच्या सदस्यांनी केला आहे. त्यांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, बलात्काराच्या घटनेला चार दिवस उलटून गेल्यानंतरही पीडितेची वैद्यकीय तपासणी न झाल्याचं वास्तव समोर आलं आहे.
रजत भद्रे आणि मनोज भगत या नराधमांनी आमदार निवासातल्या रुम नंबर 320मध्ये या मुलीवर तब्बल तीन दिवस बलात्कार केला. या दोन्ही नराधमांना आमदार निवासाचा रुमबॉय रामकृष्ण राऊतनं मदत केल्याचं समोर येत आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनीही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.