जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय, या गाण्यातून आर जे मलिष्कानं मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले. आणि ते मुंबई महापालिकेला झोंबलं.
मुंबई महापालिकेनं मलिष्काविरोधात जणू मोहीमच सुरू केली. मुंबई महापालिकेनं मलिष्काला विरोध केला, तरी अनेकांनी तिला पाठिंबा दिला.
मलिष्काला प्रशासनाकडून होणाऱ्या विरोधाला न जुमानता इतर आर जेंनी आता मलिष्काला पाठिंबा दिलाय आणि प्रशासनावर पुन्हा ताशेरे ओढले. आणि आर जेची बोलती बंद करण्याचा प्रयत्न कऱणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं.